प्रति शिक्षणमंत्र्याला चपलांचा हार
ठाणे-देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले आहे या पाठोपाठच सीबीएससी पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले .
नीट पेपर फुटी प्रकरण सीबीएससी घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलीन होत असून यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहे म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिजीत पवार यांनी मांडले या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब वेशभूषा केलेले प्रति धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील घालण्यात आला . देशातल्या विद्यार्थ्यांना खेळणं समजलं आहे हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे हा अपमान सहन केला जाणार नाही हे सरकार आम्हाला कॉकरोच समजत आहे आता कॉकरोच रस्त्यावर उतरले आहेत कॉकरोच पार्टी ला आमचे समर्थन असल्याचे माध्यमांशी बोलताना अभिजीत पवार यांनी सांगितले.
000000000
