– मुंबई महापौर चषक ॲक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
मुंबई : यजमान श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेते पदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत विजेते पदाचा मान श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने अबाधित ठेवला आहे. लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी स्थानिक आमदार सना मलिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मोहिते, जयप्रकाश अग्रवाल, लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, हरिश्चंद्र गवस, हिरा मोराळे, डॉ. महेंद्र चेंबूरकर, सचिव मोहन बामणे, आंतरराष्ट्रीय पंच मंदार म्हात्रे यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. देव स्पोर्ट्स अॅकॅडमाला उपविजेते पद मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल ससाणे, सुनिल रणपिसे, योगेश पवार, रमेश सकट, सुहास यादव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचा विजेता संघ पुढील प्रमाणे –  १) वुमेन्स पेअर – विशाखा दोरगे व रूणल रणपिसे  २) मेन्स पेअर – यज्ञेश भोस्तेकर व नमन महावर  ३)मिक्स पेअर – भूमिका भारंबे व आदित्य दिघे  ४) वुमेन्स ग्रुप – श्रद्धा मोहिते, वैदही मयेकर व साक्षी गावडे  ५) मेन्स ग्रुप –  दिक्षांत ससाणे, समर्थ खन्नुकर, अथर्व जानसकर, नमो उनियाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *