आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाला यश !
सिंधुदुर्ग: गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव या ठिकाणच्या जीर्ण व नादुरुस्त झालेल्या शेडसाठी प्रत्येकी २० लाख याप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे.
या कामाची प्रशासकीय मान्यता झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, लवकरच जुन्या शेड हटवून नवीन बांधकामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होईल असे एस.टी.प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या निर्णयाचे संबंधित गावच्या रहिवाशांनी, ग्रामस्थांनी स्वागत केले असून आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
