मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा १५ वर्षीय आयुष्य कोल्हे याने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पडली आहे. इंग्लंडमधील लीड्स येथील डॉक्टर समीर  पाठक जे तेथील क्रिकेट बियॉंड  बाऊंड्रीज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत त्यांच्यात आणि दिलीप वेंगसरकर फौंडेशन यांच्यातील करारानुसार दरवर्षी खेळाडूंच्या आदान- प्रदान नुसार वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या होतकरू खेळाडूला इंग्लंडला जाण्याची संधी मिळते.  याच कार्यक्रमाचा भाग म्हणून यंदा १५ वर्षीय आयुष्य कोल्हे याला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.  तीन आठवड्यांच्या या दौऱ्यात त्याने तेथील डरहॅम स्कूलच्या संघातून खेळताना आपल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले.
या दरम्यान त्याने एकूण १८ सामने खेळताना ८७८ धावा आणि २४ बळी मिळविले. यात त्याने ३ शतके आणि ५ अर्धशतकी खेळी केल्या आणि एकदा नाबाद १६० धावांची खेळी देखील केली.   या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूस शालेय अभ्यासाबरोबरच क्रिकेट खेळण्याची संधी मिळत असते. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून डरहॅम स्कूलच्या एका खेळाडूस दरवर्षी भारतात वेंगसरकर क्रिकेट अकादमीत येऊन सामने खेळण्याची संधी मिळत असते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *