ठाणे – ठाण्यात वृक्ष कोसळून मृत्युमुखी पडलेल्या पांडुरंग भुवड यांचा गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले – जाधव यांनी तातडीने भुवड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे वचन दिले.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून सोमवार, ६ जुलै रोजी भुवड जखमी झाले. त्यांना तातडीने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले – जाधव यांनी महावीर जितो रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या रुग्णालयातील उपचारांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने रेपाळे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून होते. मात्र दुर्देवाने उपचारादरम्यान गुरुवारी भुवड यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचे गांभीर्य ओळखून विकास रेपाळे आणि नम्रता भोसले – जाधव यांनी तात्काळ आयुक्त राव यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राव यांच्याशी फोनवरून संपर्क साधत भुवड कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. आगामी महासभेत याबाबत ठराव मंजूर करून भुवड कुटुंबाला आर्थिक मदत व वारसाला ठाणे पालिकेत नोकरी देण्यात येईल, याप्रश्नी उपमुख्यमंत्री शिंदे यांची आयुक्त राव व महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याशी चर्चा झाल्याचे रेपाळे यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीशी
भुवड कुटुंबियांचे कधीही न भरून येणारे नुकसान या घटनेनंतर झाले असून त्यांना स्थानिक नगरसेवक या नात्याने मी आणि नम्रता भोसले – जाधव वैयक्तिक मदत देत आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे विकास रेपाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *