शिवचरित्रावर व्याख्यानही उत्साही वातावरणात संपन्न                                             
मुंबई,  दि. (प्रतिनिधी): मुंबई बंदर प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या विद्यमाने शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’ या विषयावर आंबोली घाट, रिसॉर्ट येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राजू देसाई यांचा पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सन्मान  करण्यात आला. यावेळी स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी मोहन दळी, अरविंद गवळी, अशोक लोटणकर, चिटणीस, संजय माधव, कार्याध्यक्ष, अनिल कारेकर, अमोल म्हात्रे, सहकार्याध्यक्ष, चंद्रशेखर कामत, संजय कसबेकर, निळकंठ जाधव, अनिल गोलतकर, महेंद्र मसुरकर, शाहीन काझी, अनिल वाघमारे, मिलिंद घनकुटकर,अध्यक्ष, विजय सावंत, उपाध्यक्ष, खेमसिंग, विवेकानंद देसाई, उदय भिडे, महेंद्र पंडित, चिटणीस, उदय पुजारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *