मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग.११७, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्था यांच्या तर्फे १० वी, १२ वी आणि पदवी परीक्षेत उत्कृष्ठ गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या यशवंत गुणवंत कांजूरमार्ग- भांडूप- विक्रोळीकर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व उपनगर उपशहरअध्यक्ष योगेश सावंत, विभागअध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कै विमल मेहेरा व अशा मेहेरा यांच्या स्मरणार्थ व कॉलिटी फ्रुट्स वाशी नागेश सिद्धाप्पा नवलगुंड व सुपरडोन इलेक्ट्रिकल्स प्रा लि भावेश शाहा दिलीप प्रशांद व धनवंत शहा, दादर ह्यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाला विभागातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांचा बॅग आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग.११७ चे शाखाअध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभागअध्यक्ष ॲड. प्रथमेश कृष्णा धुरी आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्था संस्थापक/अध्यक्ष उमेश मोरे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *