अविनाश उबाळे
ठाणे : मुंबई व ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहापुर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात प्रचंड पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत १३७.६६ मीटर एवढी वाढ झाली आहे.असून भातसा धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात सततच्या पडणा-या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा देखील वाढत आहे.त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी,जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी, शनिवारी दुपारी १.०० वाजता भातसा धरणाचे पाच वक्रद्वारे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहेत. परिणामस्वरूप भातसा धरणातून नदीमध्ये ८६.७६५ क्युमेक्स (३०६४.१०६ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग प्रवाहीत झाला आहे.
धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा,मोडकसागर,पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली,सरलांबे ,तुते ,सावरशेत,सापगाव, खुटघर ,खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात शहापूर तहसीलदार यांना लेखी कळविण्यात आले आहे.असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता गणेश कचरे व सहाय्यक अभियंता शाम हंबीर यांनी मााहिती देेेताना सांंगितले.मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे.प्रतिदीन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्षघनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे.भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते शनिवारी भातसा धरण भरल्यानंतर जलपूूूजन करण्यात आले.
०००००
