६५ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
दिवा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, ठाणे आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत दिव्यातील विठ्ठल- रुक्मिणी नगर येथे आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा, मानसिक आरोग्य व जीवनशैली मार्गदर्शन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), ईसीजी (ECG), डोळे, नाक, कान व घसा तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक रक्त तपासणीही करण्यात आली. या आरोग्य शिबिराचा सुमारे ६५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्यायाम, योगाभ्यास, मानसिक आरोग्याची काळजी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत सपकाळ तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाचे सचिव योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. आकाश हावळे, सिसटर शोभा मोरे, मनिषा निकम, वैभव पाखड, सोनिया चव्हाण, सलोनी गाडे, मंजू जगताप, लिलाधर जाधव हा स्टाफ तेव्हा उपस्थित होता.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *