कल्याण : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्नीत ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ आणि ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत कलाशिक्षकांना प्रतिष्ठित ‘कलातपस्वी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र कलाशिक्षकांकडून अर्ज व प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत.
कला क्षेत्रातील योगदान आणि शिक्षकांचे कार्य विचारात घेऊन या पुरस्कारासाठी काही महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित कलाशिक्षकाची शाळा किंवा संस्थेतील सेवा किमान १५ वर्षे पूर्ण असावी. कलाध्यापक संघाने आयोजित केलेल्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असावा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुण फुलवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले असावेत. शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात शिक्षकाचा उल्लेखनीय सहभाग असावा. कलाशिक्षकाची स्वतःची कला क्षेत्रातील कामगिरी, कलासाधना आणि मिळालेले प्राविण्य विचारात घेतले जाईल.
हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील कलाशिक्षकांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दिनांक ५ ऑगस्ट २०२६ पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी केल्यानंतर निवडक कलाशिक्षकांना १३ ऑगस्ट रोजी आयोजित ‘एक दिवसीय कलाशिक्षकांचे कृती सत्र’ या कार्यक्रमात हा पुरस्कार अत्यंत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. हा सोहळा ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केला जात आहे.
पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी उमाकांत बोके – ९७०२०२४०१९, अमोल पाटील – ९८३३६०५१९१ यांच्याशी संपर्क साधून ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र कलाशिक्षकांनी आपले प्रस्ताव मुदतीत सादर करावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *