रोचेस बुद्धिबळ स्पर्धा
ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रोचेस बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षे वयोगटात द्रिश्या नाईक आणि १४ वर्षे वयोगटात नील कार्डोझो विजेतेपदाचे मानकरी ठरले. १६ वर्षे गटाच्या लढतीत चार फेऱ्यामधून साडेतीन गुणांची कमाई करत द्रिश्याने मुलींसह गटात अव्वल स्थान मिळवले. या गटात सिद्धांत नारायणन, अर्णव थत्ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले.१४ वर्षीय गटात पाच फेऱ्यांमध्ये नील कार्डोझोने साडेचार गुणांची नोंद करत वर्चस्व राखले. या गटात दुसरे स्थान आदिनाथ शास्त्रीने पटकावले. आदिनाथने चार आणि साडे तीन गुण मिळवणाऱ्या मीत लढेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटात तीन गुण मिळवत ईश्वरी नाईकने मुलींमध्ये पहिले स्थान मिळवले.
इतर निकाल : १२ वर्षे वयोगट (५ फेऱ्या) : मीत लढे (५ गुण), दिहिती बॅनर्जी (चार गुण), रेवन सेठी (साडे तीन गुण).
११ वर्षे  वयोगट (५ फेऱ्या) : ओम गानू,  अरिशा वाघमारे, श्रीनाथ द्विवेदी (प्रत्येकी चार गुण)
१० वर्षे वयोगट (४ फेऱ्या) : श्लोक जाधव (चार गुण), गंधार बापट (३ गुण), अथर्व सूर्यवंशी (३ गुण).
९ वर्षे वयोगट (  ४ फेऱ्या) : काव्या जाधव (चार गुण), नीरा अग्रवाल ( तीन गुण), मल्हार कदम ( तीन गुण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *