मुंबई, दि. (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे उप सभापती सचिन अहिर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, संचालक, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
