मुंबई :  फोर्टचा राजा गणराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महादेव ऊर्फ शाम ( नाना) भिमाजी गावडे (वय ६५) यांचे अलिकडेच  ह्रदयविकाराने  आकस्मिक निधन झाले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावडे यांचे काका चुलते होते. त्यांच्या पश्चात कृतिका,मनाली व जयराज ही मुले तर वृत्तपत्र लेखक – ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक ज्ञा.भि.गावडे, निवृत्त बॅक अधिकारी जय, प्रगतीशील शेतकरी विक्रम हे तीन भाऊ, तीन बहिणी आणि बाबू अविनाश, रामदास व रत्नाकर, गिरीश हे पुतणे त्यांचे आहेत. चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी फोर्ट गणेशोत्सव मंडळ,मनसे, ठाकरे सेनेचे कार्यकर्ते,फोर्ट मधील व्यापारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.  त्यांची  दशक्रिया  गावडेवाडी (अबसरी बु.जवळ)ता.आंबेगाव-पुणे येथे रविवारी ९ ऑगस्टला  सकाळी ७.३० वा.होणार आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *