उपनेते संपर्कप्रमुख – बबनराव थोरात यांचा विश्वास
नांदेड: भाजपने गेल्या बारा वर्षांमध्ये देशांमध्ये अराजकता माजवली आहे. सत्तेचा आलेला माज दिल्लीत युवकांनी संपविला. या देशामध्ये आता सत्तापालट व्हायला वेळ लागणार नाही. नांदेडची शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भरारी घेईल असा ठाम विश्वास शिवसेना (युबीटी) उपनेते तथा नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात काल आढावा बैठकीमध्ये पदाधिकारी शिवसैनिकांना संबोधित करताना केला. शिवसेना युबीटी पदाधिकाऱ्यांची एक बैठक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. शिवसेना ही लढवय्यी संघटना असून संकटामध्ये नेहमी धैर्याने लढते. कितीही संकट आली तरी शिवसेना डगमगली नाही. हा इतिहास आहे. अनेक आले आणि गेले पण शिवसेनेचा बालेकिल्ला कधीही ढासळला नाही.आणि भविष्यातही तो ढासळणारही नाही.
थोरात पुढे म्हणाले निष्ठावंत शिवसैनिकांनी आता कामाला लागलं पाहिजे. सामान्य माणसाला मोठी करते हा इतिहास शिवसेनेचा आहे भविष्यामध्ये शिवसेना भरारी घेऊन जनतेत परिवर्तनाची लाट मोठी महाराष्ट्रात तयार करील. यात कुठलीही शंका नाही. यावेळी सहसंपर्कप्रमुख दयालगिरी जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, जिल्हाप्रमुख भुजंगदादा पाटील,महानगरप्रमुख प्रकाश मारावार, मनोज यादव,युवासेना मराठवाडा सचिव महेश खेडकर,महिला जिल्हा संघटिका वत्सलाताई पुयड, युवा जिल्हाधिकारी अँड अक्षय वट्टमवार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, बाबुराव मोरे, महेश पाटील, गणेश गिरी, भालचंद्र नाईक तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम, तालुका संघटक नवनाथ पाटील जोगदंड, तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, तालुकाप्रमुख पद्माकर पाटील सावंत, तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर, तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0000
