जुन्या बॉलचा कायापालट अकादमींचे बजेट वाचवणार!
मुंबई, ३० जुलै: भारतातील क्रिकेटवेडाचा विचार करता प्रत्येक गल्लीबोळात आणि नामांकित अकादमींमध्ये दररोज हजारो क्रिकेट बॉल्स सरावासाठी वापरले जातात. मात्र, अवघ्या काही सत्रांतच हे महागडे बॉल्स खराब होऊन कचऱ्यात जातात. या समस्येवर मुंबईतील ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ (A३ Sports Craft) या कंपनीने एक भन्नाट आणि पर्यावरणपूरक तोडगा शोधून काढला आहे. कंपनीच्या ‘ए३ रीक्राफ्टेड’ (A३ ReCrafted) या उपक्रमांतर्गत वापरलेल्या जुन्या क्रिकेट बॉल्सवर अत्याधुनिक प्रक्रिया करून ते पुन्हा सरावासाठी ब्रँड न्यू बनवण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.  यात प्रथम  पृष्ठभागाची दुरुस्ती (Surface रेस्टोरेशन)म्हणजे  बॉलचे बाहेरील लेदर पुन्हा मजबूत केले जाते.यानंतर  “कोर स्टॅबिलायझेशन” (Core स्टॅबिलिझशन) म्हणजे  बॉलचा आतील कडक भाग आणि त्याचे वजन संतुलित केले जाते. त्यानंतर  “फिनिशिंग” (फिनिशिंग), यात  बॉलचा गोल आकार आणि सीमची कामगिरी पूर्ववत केली जाते, ज्यामुळे गोलंदाजांना सराव करताना मूळ मॅच बॉलसारखाच अनुभव मिळतो.
“नवीन क्रिकेट बॉल्सच्या वारंवार होणाऱ्या खरेदीमुळे अकादमी आणि क्लबचे बजेट कोलमडते. ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’च्या या रीकंडिशनिंग मॉडेलमुळे क्रीडा साहित्यावरील खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होतो. ही वाचलेली रक्कम तळागाळातील खेळाडूंच्या विकासासाठी आणि चांगल्या पायाभूत सुविधांसाठी वापरता येऊ शकते” असे कंपनी व्यवस्थापनाचे मत आहे. हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही क्रांतिकारी ठरत आहे. स्पोर्ट्स साहित्यामध्ये ‘सर्कुलर इकॉनॉमी’ (Circular Economy) म्हणजेच कचरा कमी करून पुनर्वापराला प्रोत्साहन देण्याचे काम ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ करत आहे. यामुळे नवीन उत्पादनाची गरज कमी होऊन कार्बन फूटप्रिंट (Carbon Footprint) घटण्यास मोठी मदत होत आहे. हे रीकंडिशन केलेले लाल आणि पांढरे बॉल्स प्रामुख्याने फक्त सराव सत्रांसाठीच डिझाइन केले आहेत.  खेळाला शाश्वत (Sustainable) आणि स्मार्ट बनवणारा मुंबईतील हा उपक्रम आगामी काळात देशातील क्रिकेट कोचिंगचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो, यात शंका नाही.
ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’च्या या रीकंडिशनिंग मॉडेलला सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच प्रतिसाद लाभतो आहे.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या चेंडूंच्या पुनर्वापरामुळे होणाऱ्या बचतीला मनापासून दाद दिली आहे. क्रिकेट बॉल्सच्या वाढत चाललेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना भारतीय क्रिकेटसाठी अधिकच तारक ठरू शकेल.  मुंबई क्रिकेट संघटनेने देखील या संकल्पनेचे कौतुक केले आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित,  साबा  करीम, राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे, माजी कसोटीवर करसन घावरी अशा बऱ्याच क्रिकेटपटूंनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून त्यांनी आपल्या क्रिकेट संघटना, क्लब आणि अकादमी साठी हे चेंडू स्वीकारण्यास सुरुवातही केली आहे. एम.सी.ए. सह महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन , मध्य प्रदेश क्रिकेट अससोसिएशन, सौराष्ट्र, विदर्भ या संघटनांनीदेखील क्रिकेटचे जुने चेंडू नवीन करण्याच्या प्रकल्पाला जोरदार प्रतिसाद दिला आहे.  लवकरच तळागाळातील सगळ्या क्लब आणि क्रिकेट अकादमी या प्रकल्पाचा लाभ उठवतील असा ए३ स्पोर्ट्स क्राफ्टला विश्वास आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *