मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६
मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये पोयसर जिमखान्याच्या धनुर्धरांनी उत्कृष्ट कामगिरी केली. राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये, महाराष्ट्र संघ सर्वसाधारण विजेता ठरला. पोयसर जिमखान्याने १३ सुवर्ण आणि ५ रौप्य पदकांसह महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबई स्तर चॅम्पियनशिपमध्ये, पोयसर जिमखान्याने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १ कांस्य पदकांसह द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. २३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १ कांस्य अशा एकूण ३५ पदकांसह, पोयसर जिमखान्याने या खेळात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
पोयसर जिमखान्यातील पदक विजेते:
१. वियान नाझरेथ – ५ सुवर्ण पदक
२. पानव शाह – ४ सुवर्ण आणि ४ रौप्यपदक
३. मयूर पांचाळ – ३ सुवर्ण
४. शौर्या प्रभू – २ सुवर्ण आणि १ रौप्यपदक
५. प्रगती झा – ३ सुवर्ण
६. युग मेहता – २ सुवर्ण
७. धैर्य सोनी – २ सुवर्ण आणि २ रौप्य
८. दीपक वाधवाना – १ सुवर्ण आणि १रौप्य
9. स्वरोव्हस्का डिसोझा – १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य
१०. रेयांश नादियाना – १ सुवर्ण
११. अध्रित पाखरे – २ रौप्य
या कामगिरीबद्दल बोलताना, प्रशिक्षक मिलिंद पांचाळ, आंतरराष्ट्रीय स्तरचे प्रशिक्षक आणि NSNIS आर्चेरी प्रशिक्षक म्हणाले, ‘हे यश आमच्या धनुर्धरांची कठोर मेहनत, पालकांचे पाठबळ आणि आमचे मुख्य प्रशिक्षक सुभाषचंद्र नायर सर व पोयसर जिमखाना समितीच्या मार्गदर्शनाचा परिणाम आहे. आमचे धनुर्धर महाराष्ट्र आणि मुंबईला गौरव मिळवून देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’
०००००
