पीठासीन अधिकाऱ्यांचे अधिकारी वर्गाने मानले आभार
मुंबई, दि.  (प्रतिनिधी) :महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश रवाना झाले असून अधिकारी वर्गाने त्याबद्दल पीठासीन अधिकारी तसेच सचिव यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पदोन्नती प्राप्त झालेल्या १८ अधिकाऱ्यांची नांवे आणि पदोन्नतीचे पद पुढील प्रमाणे आहे.
पदोन्नतीनुसार उपसचिव पदाकरिता सीमा तांबे, पुष्पा दळवी आणि घननीळ देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव पदाकरिता विनोद राठोड, कैलास पाझारे, जयश्री म्हात्रे, जीवन गावकर, पवन म्हात्रे आणि नेहा कोठारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अवर सचिव (समिती) पदासाठी नितीन अहेर, रविंद्र मेस्त्री आणि अलका पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कक्ष अधिकारी पदावर जान्हवी गमरे, दिनेश तरे, संतोष सुद्रिक, ज्योती कामतेकर, शुभांगी जगे आणि शितल मोरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.काल संध्याकाळी याबाबतचे आदेश विधान मंडळ सचिवालय, आस्थापना विभाग यांच्या मार्फत जारी करण्यात आले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *