मिरा -भाईंदर: मिरा – भाईंदरच्या जनतेसाठी आनंदाची बातमी आली असून काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या अखेरच्या टप्प्याची मेट्रो चाचणी सुरू झाली आहे. मिरा -भाईंदर शहरातून मुंबईच्या दिशेने लवकरच मेट्रोला सुरुवात होणार आहे. काशिगाव पर्यंतचा पहिला टप्पा एप्रिल मध्ये सुरू झाला असून पुढच्या टप्प्यासाठी जनता वाट पाहत होती. या टप्प्याची चाचणी कालच सुरू झाली असून या वर्ष अखेरपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता वाधारली आहे. यात सुमारे ९० टक्के काम पूर्ण झालं असून स्थानाकांचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. शहरातील हजारो नागरिक मेट्रो वाट पाहत असून लवकरच त्यांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.
००००००
