रमेश औताडे
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने भारतातील पहिल्या भव्य अंतराळ संशोधन मेळावाची घोषणा उद्योग मंत्री उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. हा मेळावा अंतराळ, विज्ञान आणि सायन्स-फिक्शन वर आधारित असणार आहे. असे सामंत यांनी सांगितले.
मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. अंतराळ क्षेत्रातील ज्ञान, नवकल्पना, गेमिंग आणि मनोरंजन यांना एकाच व्यासपीठावर आणून महाराष्ट्रातील स्पेस-टेक स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणूकदार व तज्ज्ञांशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.असे न नोडविण गेमिंग चे संस्थापक अक्षत राठी यांनी सांगितले.
जागतिक तज्ज्ञांची चर्चासत्रे, सायन्स-फिक्शन गेमिंग झोन, स्पेस तंत्रज्ञान प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शाळा-कॉलेज उपक्रम आयोजित केले जातील. असे आय ए एस डॉ. पी. अनबलगन, आय ए एस दीपेंद्रसिंग कुशवाह आणि प्रिमस पार्टनर्सच्या आरती हरभजंका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या निश्चित तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
