बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग
मुंबई, २६ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील अटीतटीच्या सामन्यात साउथ मुंबई मॅनियाक्सने संयम राखत मुंबई स्नायपर्सवर ६०-५९ असा निसटता विजय मिळवला.
सामन्याच्या मध्यांतरापर्यंत ‘साउथ मुंबई’कडे २९-२८ अशी अत्यंत कमी गुणांची आघाडी होती. ‘साउथ मुंबई’कडून मोईन के. याने सर्वाधिक २५ गुण नोंदवले, तर तनाय बदानीने नऊ गुणांचे योगदान दिले. गुणसंख्या ५९-५९ अशी बरोबरीत असताना, मोईनने ‘फ्री थ्रो’द्वारे गुण मिळवून ‘साउथ मुंबई’चा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, एका एकतर्फी सामन्यात ‘जेबी नवी मुंबई’ने ‘पुणे ग्लोबल स्पोर्ट्स’चा ७१-३५ (मध्यांतर: ३६-२४) असा पराभव केला. ‘नवी मुंबई’कडून अर्नेश गांगुली (२५ गुण), अभिर शेट्टी (१२ गुण) आणि जान पारेख (१० गुण) यांनी चांगली कामगिरी केली. ‘पुणे ग्लोबल स्पोर्ट्स’कडून वेदांत कदमने २० गुण नोंदवले.
निकाल – मुले: साउथ मुंबई मॅनियाक्स (मोईन के. २५, तनाय बदानी ९) विजयी विरुद्ध मुंबई स्नायपर्स (जोहान जोशुआ ३०, झायद एस. ११) – ६०-५९ (मध्यंतर: २९-२८).
जेबी नवी मुंबई (अर्नेश गांगुली २५, अभिर शेट्टी १२, जान पारेख १०) विजयी विरुद्ध पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (वेदांत कदम २०) – ७१-३५ (मध्यंतर ३६-२४).
0000
