ठाणे: पर्यावरणाचे संवर्धन आणि कोळीवाड्यांच्या सिमांकनाच्या मुद्द्याचे पोस्टर हे चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच तर्फे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून काढलेले यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.  चेंदणी कोळीवाड्यात साजरा करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी नारळी पौर्णिमेचा उत्सवात नेहमीपेक्षा जास्त उत्साह पाहायला मिळाला. नवविवाहीत, ज्येष्ठ अशी २५ जोडपी मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरातून सुरू झालेली मिरवणूक पश्चिम कोळीवाड्यातील दत्त मंदिर पुढे सिडको स्टॉप, ग. मो. कोळी मार्गे नारायणराव कोळी चौकातून चेंदणी कोळीवाडा विसर्जन घाटावर दाखल झाली. त्यानंतर त्याठिकाणी पंचवीस जोडप्यातील सौभाग्यवतींची ओटी भरण्यात आली. त्यानंतर दर्या राजाला शांत करण्यासाठी विधिवत पूजा करून या जोडप्यांच्या हस्ते  नारळ दर्याला अर्पण करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *