मुंबई : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पोईसर जिमखाना येथे २९ ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिकलबॉल खेळाचे भारतातील आद्य प्रवर्तक व ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील वालावलकर लिखित ‘बदलते क्रीडा जगत’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच प्रसंगी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोईसर जिमखानाच्या वतीने करण्यात आले आहे.
