दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर केले पूर्ण
कल्याण : आंबिवली स्टेशन ते आंबिवली गाव रस्त्याचा कायापालट झाला असून दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून महापौर हर्षाली चौधरी यांनी नागारिकांना दिलासा दिला आहे. आंबिवली पश्चिम येथील रेल्वे फाटक परिसरातील साईबाबा मंदिर ते शिवमंदिर दरम्यानचा रस्ता अमृत पाईपलाईनच्या कामामुळे बाधित झाला होता. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने खड्डेमय रस्ता झाल्याने या रस्त्यावरून ये जा करणार्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करून प्रवाशांसह प्रवास करावा लागत होता. खड्डेमय रस्त्यामुळे रेल्वे फाटक परिसरात होणारी वाहतूक कोंडीला मोठया प्रमाणात सामोरे जावे लागत असल्याने केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी या प्रश्नी आँन फिल्ड उतरत दोन दिवसात रस्त्याचे काम मार्गी लावले.
प्रशासनाकडून या रस्त्याचे काम सुरू करीत कायापालट केल्याने त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक सर्वच स्तरातून होत यानिमित्ताने होत आहे. याबाबत महापौर हर्षाली चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता बोलण्यापेक्षा रस्त्याचे काम करण्यावर भर देत नागरिकांच्या मुलभूत ,पायाभूत सुविधा सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.”
०००००००
