राष्ट्रीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा
मुंबई… नांदेड येथे आयोजित १७व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या या यशात रायगडच्या खेळाडूंनी मोठा हातभार लावला.रायगडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत  ३१ सुवर्ण,  १४ रौप्य आणि ६ कांस्य पदके‌ अशी एकुण ५१ पदकांची घसघशीत कमाई केली. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची  गोवा येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पदक विजेत्या खेळाडूंना थाई बॉक्सिंग  असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व रायगड थाई बॉक्सिंग  चे अध्यक्ष . निलेश भोसले, थाई बॉक्सिंग  असोसिएशन ऑफ पनवेल शहर  अध्यक्ष प्रतिक कारंडे , उरण तालुका  अध्यक्ष सुरज टकले, प्रशिक्षक – सुरेश राठोड, रोहित तळी, योगेश बैकर, प्रथम बहिरा यांचे  मार्गदर्शन लाभले.  पदक विजेत्या खेळाडूंचे  थायबॉक्सिंग इंडियन फेडरेशन अध्यक्ष-कुलदीप सुमनाक्षर सचिव-रविंद्र सिंह ,
थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर , अध्यक्ष  फरहान नबिजी  यांनी  अभिनंदन केले .
पदक विजेते खेळाडू. …
सुवर्ण-‌‌‌   अविशा शिंदे ,जिजा भोसले,त्रिशा भोसले,  चैत्राक्षि काकडे,वर्धन कदम, फिरोज अन्सारी, अनिकेत  दुशिंग, मयूर जाधव, करण शिरोडकर, ऋषिकेश कुमार, एलीजा आदाकुल्ला, मन्मय जट, अथर्व मदाने, वंश कोकरे, जिया मांजरेकर, सानवी सावंत, तन्वी शर्मा, रिया सेल, काव्या शेजाळे, श्रेया कुंडलकर, यशस्वी सावडेकर, विक्रांत खुटले, श्रेयश पवार, शुभम पवार, प्रिशा पाटील, स्नेहा राऊत, प्रभास रहाटे, आर्या लेंडवे, आस्था भगत, दर्शित माळी, श्रेया रहाटे
रौप्य  – वैष्णवी  सावंत, स्वामिनी शिर्के, अनन्या पाटील, सोहम सावंत, प्रात्विक मुंडले, आराध्या नंबियार, अवनीश कंक, प्रियल पानसे, आगस्त्या वैदू, शिवांक राणा, आरव नायर, अद्विका गरगडे, निष्ठा चंदाणे, रायांश जाधव
कांस्य – मृगाक्षी पॉल, नक्ष मोरे, अस्मिता शिंदे, गुरु जाधव, केशव पाटील
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *