मुंबई :  चिपळूण येथील गाणे खडपोली येथील कृष्णा अँटी आँक्सीडंन्ट प्रा. लिमिटेड कंपनीतील  कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात भरघोस साडे बारा हजार रुपयांची वाढ करणारा करार नुकताच भारतीय कामगार सेनेने कंपनीच्या व्यवस्थापना बरोबर केला आहे,अशी माहिती भा.का.से.चे संयुक्त सरचिटणीस उदय शेट्ये यांनी दिली. मागील करार संपुष्टात आल्यानंतर ही वेतनवाढ लागू होईल. यामुळे  सरासरी साडे बारा हजार रुपयांची वेतनवाढ कर्मचारी बांधवांना मिळेल.तसेच सर्व कर्मचार्‍यांना बोनस मध्येही वाढ करण्यात आली,

या करारावेळी शिवसेना नेते, खासदार भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी,संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, संयुक्त सरचिटणीस  उदय शेट्ये,  चिटणीस निशिकांत शिंदे, कंपनीचे उपाध्यक्ष अशोक पाटील,एच.आर.चे  सहाय्यक व्यवस्थापक  सुयोग चव्हाण, भा.का.से.चे युनिट  सहचिटणीस  शशिकांत शिंदे, युनिट  कार्यकारिणी सदस्य विलास चाळके,युनिट अध्यक्ष  नितीन कदम,  सुनिल चौबे, विनायक सुतार, सुनील खांबे आदी उपस्थित होते.

या कंपनीमधील कंत्राटी कामगारांना या पाचव्या वेतनवाढीच्या करारानुसार सेवेत  कायम परमनंट  करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. खडपोली एमआयडीसी मधील सध्याचा परिस्थितीत भरघोस वेतनवाढीचा करार भा. का. से. ने घडवून आणल्याबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.हा वेतनवाढीचा करार घडवून आणण्यासाठी अध्यक्ष अरविंद सावंत यांच्यासह भा.का.से.चे इतर पदाधिकारी, युनिट कमिटीचे पदाधिकारी तसेच  कंपनीचे संचालक रेहमान यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *