– सकल मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन

कल्याण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर एकदिवसीय अन्नत्याग व लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील तहसीलदार कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनात मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या काही मागण्या वेळोवेळी मान्य केल्या असल्या, तरी अद्याप काही मागण्या प्रलंबित आहेत. ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून झाल्या आहेत, त्यांना अद्याप कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाही. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले असल्याचे मराठा समाजाचे नेते अरविंद मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी आंदोलनात अरविंद मोरे, श्याम आवारे, धनंजय जोगदंड, दर्शन देशमुख, बबन जरांगे, राहुल काटकर, संदिप देसाई, सतीश पेडणेकर, शरद बिरामाने, प्रशांत पाटील, आनंद कोळेकर, कृष्णा पाटील, प्रकाश जाधव, भागुजी पाटील, अंकुश मुळीक, रवींद्र लांडे, सीताराम कोकणे, भावेश अवसरे, अमर वाघ, अजित शिंदे, सुभाष अरगुडे, दत्तात्रय पाटील, किशोर डुबे, किशोर जाधव, धनाजी देगावकर, रमेश गुंजाळ, विठ्ठल जवक,  रवींद्र कदम, गणेश निकम, सिद्धेश भोसले, भानुदास यादव, अशोक दळवी, रमेश अंधारे, गणेश गवते, उदय वाघमारे, गणेश वाबळे, अभिजित पोवार, प्रकाश मोरे, अस्मिता मोरे, वर्षा कळके, रुपाली नींबाळकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *