रमेश औताडे
मुंबई : कल्याण ज्वेलर्सने आज महाराष्ट्रातील मुलुंड येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला. अभिनेते प्रभू गणेशन आणि मलायका अरोरा यांच्या हस्ते या शोरूमचे भव्य उद्घाटन करण्यात आले. अभिनेता प्रभू गणेशन म्हणाले, ‘कल्याण ज्वेलर्स नेहमीच ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिकपणा आणि त्यांच्या आनंदाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.’
मलायका अरोरा म्हणाल्या, ‘मला पूर्ण खात्री आहे की या शहरातील लोकांना कल्याण ज्वेलर्सची उत्कृष्ट आणि युनिक डिझाइन्स नक्कीच आवडतील. तर कल्याण ज्वेलर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रमेश कल्याणरमन म्हणाले,”मुलुंडमध्ये आमचे पहिले शोरूम सुरु करून, महाराष्ट्रातील आमचे स्थान अधिक मजबूत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमची उत्कृष्ट कारागिरी, भरपूर कलेक्शन्स आणि विश्वास व पारदर्शक ते प्रती आमचा अढळ संकल्प याद्वारे ग्राहकांना दागिने खरेदीचा एक अतुलनीय आणि अविस्मरणीय अनुभव देणे, हाच आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *