उलवे :  एमके इव्हेंटचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांच्या हस्ते मंगळवारी उदघाटन झाले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मुलींनी व्यवसायात पदार्पण करणे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सध्याचा जमाना हा इव्हेंटचा आहे. तन्वी मासूम कोळी या तरुणीने नेमके हे हेरले आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा समाजात वाढत चालली आहे. तिने एमके इव्हेंट सुरू करून व्यवसायात उडी घेतली आहे. मुलींना व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सासू-सासरे, आई-वडिलांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मी माझ्या मुलीला (सोनाली) समान हक्क दिला आणि लंडन येथे उच्च शिक्षणही दिले, आज ती लग्नानंतर सोनाली रिअॅलीटी हा स्वतःचा व्यवसाय सक्षमपणे चालवत आहे. कारण तिला घरच्यांचा पाठिंबा आहे. तन्वीलाही घरच्यांचा खंबीर पाठिंबा आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याबद्दल सासू-सासरे, आई-वडिलांचेही अभिनंदन करायला हवे. साहजिकच नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय कधीही चांगलाच, त्यासाठी कठोर मेहनत करायची तयारी हवी.” यावेळी प्रवीण कोळी, माधुरी कोळी, उत्तम कोळी, बेबीताई कोळी आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *