डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून चाकरमान्यांना गावाकडे जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा
कल्याण : गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिम शहर तसेच मोहने-टिटवाळा विभागातील गणेशभक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नियोजनात तब्बल २० मोफत एसटी बसेस शुक्रवारी सायंकाळी भगवा झेंडा दाखवून गावाकडे रवाना करण्यात आल्या.
शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबीयांसह गावी जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, किरण भांगले, प्रतीक पेणकर, रुपेश सकपाळ, नगरसेविका अनघा देवळेकर, प्रमिला पाटील, अस्मिता मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
