मुकुंद रांजाणे
माथेरान: यावर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा हॉटेल व्यवस्थापक बळीराम तातोड यांच्या वतीने गणेशभक्तांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला असून गणेशभक्तांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. माथेरान मध्ये एकूण ११५ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सर्व गणेश भक्तांना प्रत्येकी तीन किलो साखरेचे वाटप जॉली चिक्की या दुकानात करण्यात आले. यावेळी वाटप करताना दिलीप नाईक, दिगंबर ढोले यांसह अन्य मित्र परिवार, नागरिक उपस्थित होते.
0000
संभाजी ब्रिगेडच्या वतीने होणार ठाण्यातील पत्रकार, डॉक्टरांचा सन्मान
अनिल ठाणेकर
ठाणे: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर “कार्यकर्ता सन्मान दिन” साजरा करण्यात येत असतो. त्याच अनुषंगाने ठाण्यातील पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना “संभाजी ब्रिगेड सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी दिली.
उद्या होणाऱ्या  या सन्मान सोहळ्यात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे, सरचिटणीस राजीव डाके ,सहचिटणीस प्रसाद सकट, उपाध्यक्ष मंडलिक, खजिनदार राजेश शेटकर, कार्याध्यक्ष शेलार, कार्यकारिणी सदस्य नितीन दुधसागर, सारिका साळुंखे, सचिन देशमाने, अमर राजभर, गजानन हरिमकर ,  यांच्यासह पत्रकार गणेश भोईटे,  अतुल पानसरे, प्रफुल वाघोले, वसंत चव्हाण, प्रिती पांड्ये, विकास काटे, संदीप लबडे, समीर मार्क॔डे, संदीप खर्डीकर,  संदीप भारती, प्रफुल्ल गांगुर्डे, गणेश थोरात, मनोज देवकर, निकेश शार्दुल , यतीन पवार, नम्रता सुर्यवंशी, संपदा शिंदे,  शिवकुमार मिश्रा, गणेश कुरकुंडे, प्रविण कामत , अनामिका भालेराव, *सिव्हील रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.. कैलास पवार, डॉ. अमोल गिते, डॉ. अजय सिंग, डॉ. अबरार,  डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. संतोष कदम, दिपाली जाधव, कविता मौल्य , अनिरूद्ध कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे, प्रदीप पूर्णेकर,निशिगंध चोरगे, जतीन शहा, आशा पाटे, मारूती भालशंकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्या दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा नरेंद्र बल्लाळ सभागृह,  ठामपा मुख्यालय,  ठाणे येथे मा. अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष योगेश पाटील,  अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शिवचरित्र आणि सद्यस्थिती या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, असे चंद्रशेखर पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *