– माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आक्षेप
ठाणे : ठाणे-लघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसी)वार्षिक अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा फोटो छापल्याचा प्रकार घडला आहे. तर भारतीय जनता पार्टीची बँकेत सत्ता असतानाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचा फोटो प्रोटोकॉल डावलून मागे टाकण्यात आला. भाजपचेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा फोटोच छापला नाही. भाजपची सत्ता असतानाही मुख्यमंत्र्‍यांचा अवमान का केला. याबद्दल अध्यक्षांना लाज वाटली पाहिजे, असा संतप्त सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी करीत सर्वसाधारण सभेत आक्षेप नोंदविला. मात्र, छपाईत अनवधानाने चूक झाल्याचे म्हणत अध्यक्ष अरुण कथोरे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *