ठाणे-लघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी गडकरी रंगायतनमध्ये पार पडली. या सभेच्या सुरुवातीलाच अनेक सदस्यांनी अहवालातील चूकांवर आक्षेप घेतला. भाजपची बँकेत सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अवमान करण्यात आला असल्याकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा फोटो का छापला, असा सवाल कपिल पाटील यांनी केला. त्यावर शरद पवार हे सहकारातील ज्येष्ठ नेते असल्याचे अध्यक्ष अरुण कथोरे पाटील यांनी दूरध्वनीवरून सांगितले. शरद पवार यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे. व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची कारकीर्द शरद पवारांनी घडवली. मात्र, बँकेच्या चेअरमनच्या दालनातील शरद पवारांचा फोटो कोणाच्या सांगण्यावरून काढला गेला, असा सवाल कपिल पाटील यांनी केला. राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा फोटो मागे टाकला गेला, याबद्दल कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सभेत कपिल पाटील यांनी व्यासपीठावर न बसता सभागृहात बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या अवमानावर लक्ष वेधले. त्याला बँकेच्या भागधारकांना साथ देऊन तीव्र संताप व्यक्त केला.
यापूर्वी शिक्षक आमदार रायगड जिल्ह्यातील असताना त्यांचा फोटो छापला गेला. राज्यात मंत्रि‍पदावर असताना जितेंद्र आव्हाड यांचा फोटो मोठा छापला होता. आता छोटा छापण्यात आला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हे सध्या कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना, त्यांचे छायाचित्र मोठे का छापले, अशी प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी केली. त्यावर छपाईत अनवधानाने चूक झाली असल्याचे अध्यक्ष अरुण कथोरे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर कपिल पाटील यांनी संबंधित प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *