Month: September 2026

महापौर शालेय कॅरम स्पर्धेच्या परेलमधील सराव उपक्रमात ६८ खेळाडू सहभागी  

मुंबई – आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ.शिरोडकर हायस्कूल व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात परेल परिसरातील ६८ शालेय खेळाडूंनी सहभाग…

 स्वामीज्ञा शेडगेचा तिहेरी सुवर्णवेध!

 पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात दमदार कामगिरी गोवा : गोव्यात झालेल्या तेराव्या पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राची १५ वर्षीय नेमबाज स्वामीज्ञा विलास शेडगे हिने उल्लेखनीय कामगिरी…

 ठाण्यात निवृत्त अधिकाऱ्याची ‘महापालिका वापसी’ लांबणीवर

नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महासभेत निर्णय ठाणे : महापालिकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर, महापालिकेच्या सचिवपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी फिल्डींग लावलेल्या बड्या अधिकाऱ्याची `महापालिका वापसी’ लांबणीवर पडली आहे. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महापालिका सचिव पदावरील उमेदवाराची निवड ही महापौरांच्या दालनातील बैठकीनंतर केली जाईल. तोपर्यंत या पदावर कोणत्याही उमेदवाराची निवड करू नये, असा निर्णय आजच्या महासभेत घेण्यात आला. ठाणे महापालिकेच्या सचिव विभागाकडील काम कार्यक्षमतेने होण्यासाठी वर्ग १ मधून निवृत्त झालेल्या अनुभवी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी महापालिका सचिव (कराराधिष्ठित) पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी ४ सप्टेंबर रोजी `वॉक इन’ मुलाखती पार पडल्या होत्या. त्या एका विशिष्ट अधिकाऱ्याला डोळ्यासमोर होत्या, असा आरोप नारायण पवार यांनी केला. या जाहिरातीला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला. महापालिका अधिनियमानुसार, सचिव पदावरील अधिकाऱ्याची कराराने नियुक्ती करता येत नसल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी मांडला. त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिका सचिवपदाची करार पद्धतीने नियुक्ती करता येत नसल्याचे मान्य केले. मात्र, विवक्षित म्हणजे काही विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करता येत असल्याचे गोदेपुरे यांनी सांगितले. त्यावर महापालिका सचिव पदासाठी जाहिरात का काढली, असा सवाल नारायण पवार यांनी केला. त्यावर महापालिका प्रशासनाला ठोस उत्तर देता आले नाही. त्यानंतर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी तूर्त महापालिका सचिव पदावर नियुक्ती करू नये. या संदर्भात महापौरांच्या दालनात बैठक झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत दिरंगाई होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक अतिरिक्त आयुक्त हा शासन सेवेतील, तर दुसरा महापालिका सेवेतील अशी तरतूद आहे. मात्र, आता दोन्ही पदांवर शासन सेवेतील अधिकारी आहेत. सहायक आयुक्तांच्या १८ पदांपैकी निम्मी पदे पालिकेतील अधिकाऱ्यांना द्यायला हवीत. मात्र, काही वर्षांपासून पदोन्नती रखडविल्या गेल्या. वेळीच पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात नसल्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले. महापालिकेकडून ९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तीन हात नाका ते माजिवडा नाक्यापर्यंतचा सेवा रस्ता कंत्राटदारांकडून खोदण्यात आला. तर अनेक भागात कंत्राटदारांनी रस्ते खोदल्यानंतर त्यांच्याकडून शुल्क घेतलेले नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या कंपन्यांना महापालिका प्रशासनाकडून अभय दिले जात आहे, असा आरोप नारायण पवार यांनी केला. 0000

नाट्य संपदा

विनोदाच्या रंगात रंगलेलं रहस्यमय नाटक! ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या प्रवाहाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने समृद्ध करणारे दिग्दर्शक आणि कलाकार लाभले आहेत. त्यामुळे विनोदी नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक रंगमंदिरातून मनमुराद हसून, हलक्याफुलक्या मनाने बाहेर पडतो. विनोदी नाटकाचे दोन हुकमी एक्के—दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेते भाऊ कदम यांचं नवं कोरं नाटक ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ सध्या रंगभूमीवर दाखल झालं आहे. नाटकाचं नाव ऐकल्यावर प्रेम, लग्न आणि विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणारी कथा असेल,असा अंदाज प्रेक्षक बांधू शकतो. मात्र, नाटकाचं शीर्षक ज्या दिशेने घेऊन जातं, त्यापेक्षा प्रत्यक्ष रंगमंचावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. विनोदाला रहस्याची जोड देत कथा पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.मोहन, त्याची पत्नी स्वाती आणि मुलगी आदिती असं हे कुटुंब. काळाच्या ओघात मोहनच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. मात्र, आपल्या मुलीला सांभाळत तो एकटाच आयुष्याचा प्रवास सुरू ठेवतो. वडिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा,  यासाठी आदिती एक   निर्णय घेते. या निर्णया मुळे मोहनच्या आयुष्यातील भूतकाळाचा वर्तमानाशी काय संबंध आहे? आदितीचा निर्णय पुढे काय वळण घेतो?  आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र नाटक पाहतानाच मिळतात.विशेष म्हणजे कथेत जाणवणारी एक अदृश्य उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत राहते. तिचं गूढ उलगडणं ही नाटकाची महत्त्वाची रंगत आहे. त्यामुळे कथानकाचा पुढचा भाग सांगून नाटकाची मजा घालवण्यापेक्षा हा रहस्यमय विनोदी  नाट्यप्रवास रंगमंचावर अनुभवणंच अधिक योग्य! संतोष पवार यांनी कौटुंबिक नात्यांमधील भावनिक पदर आणि विनोदाची लय यांचा सुरेख मेळ साधला आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवणं हे दिग्दर्शनाचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान पवार यांनी प्रभावीपणे पेललं आहे.प्रत्येक कलाकारानं कडून उत्तम अभिनय करून घेतला आहे भाऊ कदम म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर विनोदाची एक वेगळीच शैली उभी राहते. ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ या नाटकातही त्यांच्या अभिनयाची हीच सहजता प्रकर्षाने जाणवते. मोहन ही व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी केवळ विनोदावर भर न देता त्याच्या मनातील भावनिक कोंडी, एकटेपणा आणि नात्यांमधील गुंतागुंतही प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांची संवादफेक, प्रसंगानुरूप देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव यामुळे विनोदी प्रसंग अधिक खुलतात. भाऊ कदम यांच्या अभिनयातील सहजपणा ही या प्रयोगाची मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या रंगमंचावरील उपस्थितीने प्रसंगाला वेगळीच रंगत येते आणि प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद निर्माण होतो.मैथिली वारंग, सुजाता किरण, पूनम सरोदे परब आणि साकार देसाई यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत नाटकाच्या एकूण सादरीकरणाला पूरक साथ दिली आहे. लेखक स्वप्नील बारसकर यांनी विषयाची मांडणी हलक्याफुलक्या शैलीत केली आहे. संवादांमधून विनोद निर्माण करतानाच नात्यांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न दिसून येतो. विशेष म्हणजे विनोद आणि रहस्य यांचा समतोल राखत कथा पुढे नेण्यात लेखनाची भूमिका महत्त्वाची ठरते. नाटकाची तांत्रिक बाजूही कथेला पूरक ठरते. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा योग्य वापर करण्यात आला आहे. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती होत असल्याने नाटकाच्या सादरीकरणाला उठाव मिळतो. पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ हे नावापेक्षा वेगळा अनुभव देणारं, हलक्याफुलक्या विनोदातून प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहणारं मनोरंजनप्रधान रहस्यमय नाटक आहे. गंभीर विषयाचा बोजडपणा न आणता विनोद आणि रहस्य यांची सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न या प्रयोगातून केला आहे. संपदा सावंत

– ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा पश्चिम विभागीय स्पर्धेत सुवर्णविजय

अर्जुन बिराजदारचा तिहेरी मुकुट  बिराजदार बंधूंचा दुहेरी मुकुट, अकॅडमीला ५ सुवर्णांसह १ कांस्यपदक ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे राबविण्यात येणाऱ्या ‘सय्यद मोदी बॅडमिंटन…

– दक्षिण आफ्रिकेत रंगणार ज्युनिअर इनडोअर क्रिकेटचा विश्वकप!

वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने  सात देश, पाच वयोगट आणि युवा क्रिकेटपटूंसाठी जागतिक व्यासपीठ प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका : जगभरातील युवा इनडोअर क्रिकेटपटूंच्या कौशल्याची खरी कसोटी ठरणारी वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनची ज्युनिअर वर्ल्ड सिरीज २०२६ येत्या २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथील यू-प्रो ॲटरबरी ॲक्शन स्पोर्ट्स एरिना येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) असे सात देश या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने युवा इनडोअर क्रिकेटचा हा जागतिक महाकुंभ ठरणार आहे. वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशन (WICF) मान्यतेने इनडोअर क्रिकेट साऊथ आफ्रिका (ICSA) यांच्या आयोजनातून ही स्पर्धा होत आहे. इनडोअर क्रिकेटमधील बलाढ्य ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या मजबूत संघांविरुद्ध खेळाडूंना खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. भारत, श्रीलंका आणि यूएईचा सहभाग असल्याने प्रत्येक सामना कौशल्य, वेग, रणनीती आणि मानसिक ताकदीची परीक्षा घेणारा ठरणार आहे. जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी सातही देशांचे युवा खेळाडू सज्ज झाले आहेत. या जागतिक स्पर्धेत पाच वयोगटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. १३ वर्षांखालील मुलांचा, १५ वर्षांखालील मुलांचा व मुलींचा, तसेच १७ वर्षांखालील मुलांचा व मुलींचा समावेश आहे. त्यामुळे विविध वयोगटातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेची प्रशासकीय आणि कार्यकारी राजधानी प्रिटोरिया या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यू-प्रो ॲटरबरी ॲक्शन स्पोर्ट्स एरिना येथे सात देशांतील युवा खेळाडू आमनेसामने येतील. आपल्या देशाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हा अनुभव अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण असणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणे ही निश्चितच मोठी कामगिरी आहे; मात्र खरी परीक्षा प्रिटोरियाच्या मैदानावर होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्य, वेगवान निर्णयक्षमता, सांघिक खेळ, दबाव हाताळण्याची क्षमता आणि निर्णायक क्षणी योग्य खेळ करण्याचे कौशल्य या सर्व बाबींची कसोटी लागणार आहे. सात देश, पाच वयोगट आणि आठ दिवसांचा जागतिक इनडोअर क्रिकेटचा थरार अशी या स्पर्धेची भव्यता आहे. मात्र या स्पर्धेचे खरे महत्त्व पदक किंवा विजेतेपदापलीकडे आहे. युवा खेळाडूंच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा पाया मजबूत करण्याची ही मोठी संधी आहे. २६ सप्टेंबरपासून प्रिटोरियात भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे प्रशिक्षक, निवडकर्ते आणि इनडोअर क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक सामना त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. देशासाठी खेळताना मिळणारा हा अनुभव भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना अधिक सक्षम करणार आहे. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रिटोरिया येथे इनडोअर क्रिकेटच्या युवा विश्वातील सर्वोत्तम प्रतिभेचा सामना पाहायला मिळणार आहे. जागतिक मंच सज्ज आहे, सात देश मैदानात उतरणार आहेत आणि युवा खेळाडूंच्या स्वप्नांना आता प्रत्यक्ष कामगिरीची जोड द्यायची आहे. प्रिटोरियातील ही स्पर्धा अनेक युवा खेळाडूंसाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पहिली मोठी ओळख ठरण्याची शक्यता आहे असे भारतीय आयआयएसएफचे अध्यक्ष सेट्रिक जो, सेक्रेटरी प्रसन्ना कुमार, चेअरमन अजय नाईक व माजी सेक्रेटरी मिलिंद पुंजा यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्जाचे आवाहन

 सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सवालाही संधी; अर्जाची अंतिम मुदत १६ व २० सप्टेंबर नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त आणि सामाजिक प्रबोधनाची जोड देण्यासाठी यंदा ‘नवी…

लास वेगासच्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड

६५ किलो फ्रीस्टाइल गटात करणार भारताचे प्रतिनिधित्व; ‘शिवसेना विथ जेन झी’ उपक्रमातून सत्कार कल्याण : कल्याण पूर्व, नांदिवली येथील जय बजरंग कुस्ती आखाड्याची युवा कुस्तीपटू वैष्णवी पाटील हिची अमेरिकेतील लास वेगास येथे…

 दोन दिवसांत डांबर उडाले, रस्त्यावर खडीचे साम्राज्य

डोंबिवलीतील निकृष्ट डांबरीकरणाचा सत्यवान म्हात्रेंनी केला पर्दाफाश कल्याण : डोंबिवली शहरातील रस्त्यांवर करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाच्या दर्जावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्याचे डांबरीकरण होऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच डांबर उखडून रस्त्यावर खडी पसरल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी उघडकीस आणला आहे. डांबर उखडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली असून, वाहनचालकांना त्यावरून वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही खडी धोकादायक ठरू शकते. अचानक वाहन घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी मोठा खर्च केला जात असताना अवघ्या दोन दिवसांत डांबर उखडत असेल, तर कामाच्या दर्जाची तपासणी नेमकी कशी केली जाते, असा सवाल सत्यवान म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाची पाहणी करून निकृष्ट कामाबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अशी टीका करत सत्यवान म्हात्रे यांनी डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या पैशातून होणारी विकासकामे टिकाऊ आणि दर्जेदार असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. 000000

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

कापडी पिशवी व्हेंडिंग मशीन, सौर पथदिव्यांसह शेतकरी-व्यापारी भवनाच्या कामाला सुरुवात कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कापडी पिशवी व्हेंडिंग मशीनचे ५ संच, सौर ऊर्जेवर चालणारे ३० पथदिवे, शेतकरी व व्यापारी भवन तसेच मुख्य बाजार आवाराच्या प्रवेशद्वाराच्या कामाचा समावेश आहे. या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील यांच्यासह बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी बाजार समितीने सुरू केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कापडी पिशवी व्हेंडिंग मशीन बसविणे हा प्लास्टिकमुक्त बाजार समितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, रस्ते, वीज, पाणी, शेतकरी भवन, माथाडी भवन यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बाजार समितीच्या स्विच लाईट स्टेशनसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कथोरे यांनी दिली. बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने एकत्रितपणे काम करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी अधिकाधिक सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास वसंत लोणे, नरेश सुरोशी, भरत गोंधळे, कपील थळे, शंकर आव्हाड, योगेश धुमाळ, रवींद्र भोईर, मनोहर पाटील, रवींद्र आव्हाड, विजय सुरोशी, गिरीश पाटील, अरुण पाटील, किशोर वाडेकर, काशिनाथ नरवडे, विद्या पाटील, शारदा पाटील यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, व्यापारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.