पुणे : लोणावळ्यातील भुशी भुशी डॅम धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी अन्सारी कुटुंब येथे आले होते. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने अख्ख कुटुंब वाहवून गेले. ग्रामस्थ,  वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने  शोधमोहीम सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांपैकी  लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.

भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखलं जातं.अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत  वर्षाविहारासाठी या परिसरात  आले होता. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब . मात्र, पाण्याला वेग असल्याने  वाहून गेले. ऐकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पुर्ण कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येते, तिथं  शोधकार्य सुरू आहे.

पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.  लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

मावळ तालुक्यात भुशी धरण, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, गड-किल्ले, लेण्याद्री., आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड-किल्ले परिसर. तर वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण आणि परिसरात वर्षापर्यटनासाठी मोठी गर्दी होते. मुंबई, पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी या धरणांना पसंती असते. प्रत्येक विकएण्ड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. या धरण आणि इतर भागात नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणा-या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *