उल्हासनगर : उल्हासनगर येथील स्वामी शांतीप्रकाश आश्रमात गोशाळा हे भाविकांसाठी अनेक वर्षांपासून श्रद्धेची ठिकाण असून आता ही गोशाळा तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण बनविली जात आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणारी ही ठाणे जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोशाळा असल्याची माहिती स्वामी देवप्रकाश महाराज यांनी दिली.
स्वामी शांतीप्रकाश आश्रमातील राधेश्याम गोशाळेत स्वामी देवप्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर- 5 येथील स्वामी शांतीप्रकाश मंदिरात बांधलेल्या गोशाळेत अनेक वर्षांपासून 1700 गायींची सेवा केली जात असून गायी सोबतच कबुतर, पक्षी देखील आहेत. तेथे सेवा दिली जाते.
सामान्य दिवशी कोणीही व्यक्ती पवित्र वातावरणात असलेल्या गोठ्यात जाऊन गाईंना गवत, केळी इत्यादी खायला घालू शकते. तेथे गवत, केळी, भाज्या इत्यादींची विशेष स्वच्छता केली जाते आणि विशेष पौष्टिक आहारही दिला जातो. गाई नेहमीच्या नित्यक्रमानुसार, गायींसाठी येथे आयोडीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते.
गेल्या काही दिवसांपासून ही गोशाळा अत्याधुनिक पद्धतीने बनविली जात असून गाईच्या सेवेसाठी लागणारे गवत किंवा खाद्यपदार्थ सहज पोहोचवण्यासाठी ट्रॉली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गोरक्षण आणि उपचारासाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.