ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे.
खरीप हंगाम २०२४ करीता शेतकरी नोंदणी करिता 15 जुलै अंतिम तारीख होती. यास आता 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. दि.28 जुलै 2024 अखेर ठाणे जिल्ह्यात 63 हजार 139, पालघर जिल्ह्यात 39 हजार 861, रायगड मध्ये 31 हजार 803, रत्नागिरी 10 हजार 563 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 हजार 648 असे विभागात एकूण 1 लाख 62 हजार 014 शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीकासाठी विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – रु.51 हजार 760 रत्नागिरी जिल्ह्यात भात पीकासाठी विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – रु.50 हजार ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी पीकासाठी विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – रु.20 हजार पालघर जिल्ह्यात उडीद पीकासाठी विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 25 हजार अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पीकांचाच विमा उतरवता येतो. विविध जोखमींतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनातील अटी व शर्तींच्या अधीन राहून निश्चित केली जाईल. शेतकरी नोंदणीसाठी शेवटचा 1 दिवस बाकी असून पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी आजच (31 जुलै 2024) विमा उतरवावा, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *