रमेश औताडे
मुंबई : खा. राहुल गांधी यांचे नाव न घेता भाजपा खा. अनुराग ठाकूर यांनी अधिवेशन काळात भर संसदेत जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मुंबई काँग्रेस कार्यालय समोर निषेधाच्या घोषणा देत ठाकूर यांच्या प्रतिमेला काळे फासले.
भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी भर संसदेत जातीयवादी टिप्पणी करत राहुल गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही निदर्शने करण्यात आली.
अनुराग ठाकूर यांच्या या जातीयटिप्पणीला खुद्द पंतप्रधानांनी ट्वीट केलं ही सुध्दा संतापजनक गोष्ट आहे. नरेंद्र मोदींच्या या जातीय मानसिकतेचाही आम्ही निषेध करतो. ही जातीयवादी भूमिका अशीच सुरू राहिली तर लोक चौकाचौकात ठाकूरचे पुतळे जाळतील असा इशारा मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी यावेळी दिला.
मुंबई कॉंग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
00000