गजानन घुगे यांचा गुंडागर्दी आणि दहशतीच्या छायेत पक्षासाठी २० दिवस मोहम्मदाबाद विधानसभा क्षेत्रात (गाजीपुर) येथे कार्यकर्ता म्हणून प्रचार करताना आलेला अनुभव..! कालपासून टीव्ही, सोशल मीडिया मध्ये मुख्तार अंन्सारी त्याच्या कुकर्माने मेल्याची बातमी दिसत आहे. हा तोच गुंड आहे ज्याने आपल्या विरोधात २००२ मध्ये भाजपा कडून निवडून आलेल्या स्व.आमदार कृष्णानंद राय यांची २००५ मध्ये निर्घृण हत्या केलेली. यानंतर उसळलेल्या दंग्यात हिंदू रक्षणार्थ गेलेल्या श्री.योगी आदित्यनाथ जी यांच्या ताफ्या वर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आलेले, त्यावेळी एकूण १७ हिंदू बांधव मारले गेलेले. त्यावेळी सत्तेत असलेल्या मुलायम सिंग यांनी हिंदूंना संरक्षण द्यायचे सोडून अन्सारी गँग ला पोषक भूमिका घेतली. पण योगीजींच्या भूमिकेने दंगे थांबले, हिंदूंना सुरक्षा मिळाली. त्या भाजपा कार्यकर्त्यांना मारणारा हा मुख्तार अंन्सारी काल जेल मध्ये मेला. याआधी त्या अन्सारी ने दहशती मधून कमावलेली संपत्ती योगीजींच्या सरकारने एकतर जप्त केलीये किंवा जमीनदोस्त करून टाकली आहे. मुख्तार अंन्सारी मारला गेल्याचा आनंद च आहे.
याच मुख्तार च्या मतदारसंघात भाजपा उमेदवार मा.आमदार. श्रीमती अलका राय (कृष्णानंद राय यांच्या कुटुंबातील प्रतिनिधी) यांच्या प्रचारार्थ मला (गजानन घुगे) पक्षाने जि. गाजीपुर मध्ये पाठवलेले. विरोधात उमेदवार होता मुख्तार अंन्सारी चा मुलगा सुहेब मुन्नू अंसारी, याठिकाणी भाजपा ने कडवी झुंज दिली. दहशत आणि भीती च्या वातावरणात इथला भाजपा कार्यकर्ता प्रचार करत होता. मी याठिकाणी प्रवासी कार्यकर्ता म्हणून पाठविले होते.मोम्हदाबाद मतदारसंघातील कार्यक्रम, प्रचार यावर माझं नियंत्रण होत, स्थानिक यंत्रणा आणि पक्ष यामध्ये समन्वय साधण्याचं काम मी करत होतो. याकाळात आमच्या सुरक्षेची जबाबदारी उत्तरप्रदेश पोलीस आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते सांभाळत होते. ज्याठिकाणी भाजपा ला पोलिंग एजंट मिळणे मुश्किल होते तिथं भाजपा उमेदवार श्रीमंती अलकाजी राॅय यांना ९२ हजार मतदान मिळाले. ही कडवी लढत योगीजी च्या मार्गदर्शनाखाली व भाजपा कार्यकर्त्यांच्या जोरावर लढली गेली.आज भारतभर मुख्तार मारला गेल्याची बातमी होत आहे, सगळीकडे तीच चर्चा आहे इतकी दहशत आणि गुंडगिरी या नराधम फॅमिली ची होती, त्याठिकाणी मी तब्बल २० दिवस पक्षकार्य करण्यासाठी कार्यरत होतो. जेव्हा पक्षाने मला गाजीपुर जि. मध्ये जाण्याचा आदेश दिला तेव्हा मी जायला निघाल्यावर माझे एक सहकारी, ज्यांना इथली माहिती होती, त्यांनी कॉल केला आणि म्हणाले, गजानन दादा, पक्षावर असलेली तुमची निष्ठा आणि तळमळ मला माहिती आहे, पण आपण मोहम्मदाबाद ला जायचा पुनर्विचार करा. पण मी परिणामांची चिंता न करता कुटुंबाचा विरोध असतानाही पक्षकार्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो, आणि भाजपा उमेदवार श्रीमती अलका राॅय यांच्या प्रचारात पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम केले.
मुख्तार अन्सारी आणि फॅमिली ने मोहम्मदाबाद आणि परिसरात आपलं साम्राज्य उभा केलेले, इतकी गुंडगिरी, दहशत होती की सामान्य माणसाला जगणं मुश्किल होत, विशेषतः हिंदू धर्मीय लोकांना अतीव यातना आणि त्रास सहन करावा लागत होता. कित्येक व्यापारी स्थलांतरित झाले होते. आज तिथल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला आहे. मोहम्मदाबाद चुनाव क्षेत्रातील पदाधिकारी मला फक्त एकच विनंती करायचे की आपण पक्षश्रेष्ठींनी अहवाल देताना अन्सारी या नावाचा नायनाट करा आणि हिंदू वाचवा एवढंच सांगा म्हणायचे. मी सुद्धा २० दिवसात माझ्या नजरेत आलेले निरीक्षणे आणि घडामोडी अहवालात नमूद करून पक्षश्रेष्ठींकडे मांडल्या.
हा अन्सारी म्हणजे समाजवादी पार्टी ने पोसलेल्या हिंदूविरोधी गुंड होता, या अन्सारी चे चुलते हमीद अन्सारी काँग्रेसकडून उपराष्ट्रपती म्हणून नेमणूक झालेले. या एवढ्या गोष्टीवरून आपल्याला समजू शकते की हिंदूविरोधी नेमकं कोण आहे. माझी राजकारण-समाजकारनात ४०-४२ वर्षे गेलीत, अन्सारी प्रकरण पाहून, मी जनतेला एकच आव्हान करेल की काही विकास कामे उशिरा होतील, पण आपला हिंदुस्थान अबाधीत राहिला पाहिजे, हिंदूंना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, हिंदू धर्माची प्रतीके आणि स्मारके चिरंतन टिकली पाहिजेत.
देव-धर्म-देश यांची प्रतिष्ठा उंचावली पाहिजे. मोदीजी-योगीजी यांच्या सारखे निडर योद्धे आपल्या मनातील संकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
काल मुख्तार अन्सारी मेल्याची बातमी आली आणि मोहम्मदाबाद (गाजीपुर) मधल्या कित्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कॉल आणि मेसेज आले, त्यांना झालेला आनंद गगनात मावणार नाही असाच आहे. मी सुद्धा एक भाजपा पक्ष कार्यकर्ता आणि हिंदू म्हणून तिथल्या जनतेच्या आनंदात सहभागी आहे.
मागच्या ७ वर्षात योगीजींच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेश मधले गुंड एकतर यमसदनी गेलेत किंवा सुतासारखे सरळ झालेत.या अन्सारी टोळीतील ९६ लोक मारले गेलेत किंवा जेल मध्ये टाकलेत. हा पराक्रम मोदी-योगी ही जोडीच करू शकते.
या गुंडांच्या दहशती मध्ये २० दिवस भाजपा पक्षकार्य करताना कार्यकर्ते , पोलिंग एजंट यांच्या सोबत चा संवाद आठवला तरी अंगार काटा उभा राहतो. आज त्या भीती चा अंत झाला आहे. मोहम्मदाबाद ची दहशत संपुष्टात आली आहे. आता फ़क्त योगीजींनी त्या शहराचे नवीन नामकरण करून दहशतीचे दुस्वप्न नष्ट करावे हीच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अपेक्षा.
-◆गजाननराव विठ्ठलराव घुगे◆
प्रवासी कार्यकर्ता निरीक्षक- मोहम्मदाबाद चुनाव क्षेत्र- २०२२
