अनिल ठाणेकर
ठाणे : नजीबभाईसाठी एक संकल्प करुयात की, माता की चौकी च्या या शुभदिनी व नवरात्रीच्या नऊ दिवशी नवदुर्गेची आपण सर्वजण पूजा करतो त्या या मंगलदिनी नजीबभाई यांना आपला भाऊ मानून नजीबभाई यांना अजून अधिक ताकद देऊयात .नजीबभाई अनेक वर्षापासून येथे काम करीत आहेत. महापालिकेतही अनेक वर्षापासून काम केले आहे. इथल्या लोकांबरोबर त्यांचे एक वेगळे नाते आहे. इथली कोणतीह गोष्ट असूदे की विकासाचे काम असू दे नजीबभाई हे लोकांबरोबर मिळून मिसळून काम करण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे महायुती योग्यवेळी उमेदवारी जाहीर करेलच पण आमची इच्छा आहे की नजीबभाईंना लोकान भरभरून आशिर्वाद द्यावेत, त्यांना सक्रिय पाठिंबा द्यावा. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा आहे की येथे चांगला बदल व्हावा. नजीबभाईंच्या रुपाने हा बदल व्हावा ही इथल्या सर्वांचीच इच्छा आहे, असे मत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभाग मंत्री ना आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी कळवे पू. येथील मफतलाल मैदानात, आतकोनेश्वर नगर नंबर १ येथे ‘माता की चौकी’ या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध भोजपूरी लोकगायक शिवम पांडेय, सुप्रसिद्ध लोकगायिका ममता उपाध्याय व खुशबू दुबे यांचे विशेष आकर्षण होते. तसेच भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना माजी नगरसेवक गणेश साळवी, उमेश पाटील, शाम पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश बर्डे, अंकिता शिंदे, महिला अध्यक्ष वनिताताई गोतपागर, कार्याध्यक्ष मनिषाताई भगत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, युवक अध्यक्ष विरु वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवरात्रीच्या शुभेच्छा देतानाच माता की चौकी चे आयोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे सर्व कलाकार यांना सुद्धा शुभेच्छा देते या कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने महिलाची उपस्थित लावल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक नजीबभाई मुल्ला व आनंदजी परांजपे यांना धन्यवाद देते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब व आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे त्या योजनेला पाठिंबा देण्यासाठी व पुढे ही योजना अशीच चालत रहावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. नजीबभाई हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असतात, प्रत्येकाच्या सुखदुःखात नजीबभाई सहभागी होत असतात, आज आपण सर्वजण मिळून नजीबभाईसाठी एक संकल्प करुयात की, माता की चौकी च्या या शुभदिनी व नवरात्रीच्या नऊ दिवशी दुर्गादेधीची आपण सर्वजण पूजा करतो त्या या मंगलदिनी नजीबभाई यांना आपला भाऊ मानून नजीबभाई यांना अजून अधिक ताकद देऊयात. यात महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत याद्वारे नजीब मुल्ला यांना ताकद देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करीत आहोत, याचा विशेष आनंद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसादावरून यात सहभागी महिलांच्या चेहर्यावर खुषी दिसत आहे आनंद दिसत आहे. ते पाहून आम्हाला समाधान प्राप्त होत आहे. पुढच्या कालावधीत अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सुखदुःखात त्यांच्यासाठी माता की चौकी सारखे कार्यक्रम आयोजित करुन त्यांच्या आयुष्यात बदल आणण्याच्या दृष्टीने नजीबभाई, आनंदजी व महायुतीचे सरकार निश्चित प्रयत्न करीन आहे. विरोधकांकडे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबद्दल बोलण्यापाठी काहीही उरलेले नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे लाभ महिलांपर्यंत पोहोचलेला आहे. साधारणपणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे.जे विरोधक म्हणत होते की आम्ही महिलाना भूलथापा देत आहोत, फक्त जीआर काढला आहे, याचे पैसे मिळणार नाहीत, याचा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार नाही पण सत्य आपल्या समोर आहे. यामुळेच महिलांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे.ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील महिला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अत्यंत खूश आहेत. त्थांना एका गोष्टीचे समाधान आहे की महायुतीचे सरकारने त्यांना आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. आम्हाला अनेक महिला भेटल्या ज्या त्यांच्या आयुष्यात खऱ्याअर्थाने हा जो सन्माननिधी १५०० रुपयांचा वितरित करीत असतो त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप चांगले बदल त्यांना अनुभवायाला मिळाले आहेत. नजीबभाई यांना ताकद द्या असे आवाहन मी यानिमित्ताने महिलांना करीत आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरुवातीपासूनच हे म्हणणे राहिले आहे की, आम्ही सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन काम करतो आमचा विचार विकासाचा आहे. तो कोणत्याही कम्युनिटीबेसवर आधारित नाही.सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांचा विकास करणे हा आमचा मूळ विचार आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली अशाचपद्धतीने यापुढेही आम्ही काम करत राहू, असा विश्वास ना.आदितीताई तटकरे यांनी शेवटी व्यक्त केला.
००००००
