शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रील बांधनपाडा गावातील फार्महाऊसवर वनविभागाची धडक कारवाई

अनिल ठाणेकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये डोळखांब वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बांधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर वनविभागाने धडक कारवाई केली आहे. धार्मिक विधी, होम हवन व कोरीव काम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरीची लाकडांची तस्करी करणाऱ्या फार्महाऊस वर धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याला आला आहे.

शहापूर तालुक्यातील वनक्षेत्र डोळखांब हद्दीतील आजोबापर्वत रांगामध्ये पांढरीची लाकडे आढळून येतात. दरम्यान पांढरीची लाकडाची साठवणूक करून ठेवलेल्या अनिल देशमुख यांच्या फार्महाऊसवर वनविभागा मार्फत धाड टाकून जप्त करण्यात आली आहेत. अनिल देशमुख या व्यक्तीच्या फार्महाऊसवर ह्या लाकडावर मशीनद्वारे कला कौशल्य करत त्यापासून अंधश्रध्दे करीता लागणाऱ्या वस्तू  होमहवणासाठी व बनवल्या जात होत्या. याबाबतची माहिती वन विभागाला समजताच अधिकाऱ्यांनी या फार्महाऊसवर धाड टाकत कारवाई केली. पांढरीची लाकडे तोडण्यासाठी व साठवण करण्यासाठी वनविभागाची कुठल्याही प्रकाराची परवानगी नसतांना अनिल देशमुख यांच्या मालकीच्या फार्म हाऊसमध्ये आदिवासी मजुरांकडून कवडीमोलाने ही दुर्मिळ  लाकडे गोळा केली जात होती. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत हा गोरख धंदा सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. अंधश्रध्देकरिता या लाकडाचा वापर केला जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. याबाबतची माहिती मिळताच त्यांनी फार्महाऊस वर धाड टाकून, पांढरीची लाकडे, कोरीव काम करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीनसह लाखो रुपयांचा माल वनविभागने ताब्यात घेतला आहे. जप्त करण्यात आलेले साहित्य आसनगाव वन डेपोमध्ये नेण्यात आलं असुन पुढील तपास सुरु आहे. अंधश्रध्देकरिता या लाकडाचा वापर केला जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *