अनिल ठाणेकर

ठाणे : मुंब्रा कळव्यातील लोकांना टोरन्ट पाॅवर चे ३५० युनिट चे विजेचे बिल महिन्याला ४ ते ५ हजार रुपये येते, या प्रत्येक वीजधारकाच्या बिलातुन ३६० रुपये टक्केवारी येथील स्थानिक आमदार ज्यांना मिस्टर पर्सेंटस असे संबोधले जाते त्यांना जात आहे. हे बिल पाहून आपले हृदय जळत आहे की मी कोणाला निवडून दिले ? यामुळेच येत्या निवडणुकीत आपल्या बिलातुन टक्केवारी घेणाऱ्याला पाडा आणि टक्केवारीची टोरन्ट पाॅवर बंद करण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन  १४९- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी मतदारांना केले.यावेळी माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, मोबिन सुर्वे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.

१४९- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत (शिवसेना, भाजपा, आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार रॅली रविवारी, १० नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३१ येथील रोशनी महल, आनंद सोसायटी हनुमान नगर, ठाकूर पाडा,सम्राट नगर, संजय नगर, नासिक वार्ड, जे पी सोसायटी, गीते कॅम्प, शंकर मंदिर, आंबेडकर नगर, आनंद कोळीवाडा, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, नारायण हाऊस, शांती नगर, नारायण नगर शमशाद नगर ते आयशा मस्जिद या मार्गावरून निघाली असताना या रॅलीत नजीब मुल्ला यांनी मतदारांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *