ठाणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ठाण्यातील गावदेवी मैदानावर रविवारी सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ठाणेकरांना शहराच्या विकासाचे व्हिजन ऐकावयास मिळेल.
भाजपाचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केळकर यांच्यासह कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडा मतदारसंघातील प्रताप सरनाईक, मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा होत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या सभेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, आरपीआयचे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे,यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांबरोबरच महायुतीचे कार्यकर्तेही उपस्थित राहतील. या सभेसाठी महायुतीकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
0000