भिवंडी : आज दि.२५/११/२०२४ रोजी मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अजय वैद्य यांचे अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके, उप-आयुक्त (अनधिकृत बांधकाम) यांचे समवेत अनधिकृत बांधकाम निष्कासन करणेकामी बैठक पार पडली. या बैठकीस विधी अधिकारी, प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती क्र. १ ते ५, बिट निरिक्षक, सहाय्यक विधी अधिकारी आणि परवाना विभाग प्रमुख श्री. प्रकाश राठोड उपस्थित होते. मा. प्रशासक तथा आयुक्त यांनी शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे, बॅनर्स, होर्डींग यांचा आढवा घेतला.
मा. प्रशासक तथा आयुक्त यांनी सर्व प्रभाग अधिकारी यांना आदेश दिले आहेत की, सद्यः स्थितीत शहरातील अनधिकृत बांधकामे पुढील तीन महिन्यात निष्कसीत करण्याचा सविस्तर कृती आराखडा येत्या ७ दिवसात सर्व प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती क्र. १ ते ५ यांनी सादर करावा. तसेच ज्या ठिकाणी बांधकामे सुरु आहेत त्या प्रभागातील शहानीशा अधिका-यांमार्फत कागदपत्रांची पडताळणी करुन, जर ते बांधकाम अनधीकृत आढळल्यास तातडीने निष्कासनाची कार्यवाही करावी. ज्या प्रकरणी मा. न्यायालयाने आदेश पारीत केले आहेत त्या प्रकरणी विना विलंब कारवाई करावी, जर एखाद्या प्रभाग अधिका-याने जाणीव पुर्वक विलंब केल्यास त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा देखील सुचना दिल्या. प्रभाग अधिका-यांच्या सहायतेसाठी सहाय्यक विधी अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांचे काम योग्यरित्या सुरु आहे किंवा कसे याचा प्रत्येक आठवड्याला आढवा घेण्याचे आयुक्तांनी सुतोवाच केले. ज्या बांधकाम प्रकरणी मा. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती अथवा स्थगन आदेश दिले असल्यास प्रभाग अधिका-यांनी त्याच दिवशी सबंधीत बांधकामाचे आहे, त्या स्थितीत व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन त्याचा अहवाल सादर करावा. तसेच त्या ठिकाणी पुढे कोणतेही अनधिकृत वाढीव बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत प्रभाग अधिका-यांनी पुढील ७ दिवसात कार्यवाही न केल्यास त्यांचे विरुध्द उप-आयुक्त (मुख्यालय) यांनी कारवाई प्रस्तावीत करावी असे आदेश दिले. व-हाळा तलाव येथील अतिक्रमणे हटविण्याच्या सुचना दिल्या. या पुढे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाच्या बाबतीत Zero Tolerance धोरण राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमुद केले.
निवडणूकीच्या कालावधीत जे अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग लागले आहेत ते तात्काळ काढुन गुन्हे दाखल करणे बाबत सबंधीत प्रभाग अधिकारी यांना व त्याची माहिती संकलीत करणे बाबत परवाना विभाग प्रमुख श्री. प्रकाश राठोड यांना सुचना दिल्या आहेत.
0000