– ठाण्यातील बचत गटांच्या महिला, अधिकारी आणि कर्मचारी यांचा कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग

ठाणे : बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला. त्यात देशभरातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकही सहभागी झाले. बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचेही याप्रसंगी अनावरण करण्यात आले. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात, अतिरिक्त आयु्क्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते.

यावेळी, ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी  बालविवाह मुक्त भारताची सामुहिक शपथ घेतली. तसेच, शाळा, आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *