00000
बदलापूर : गरजू आणि दिव्यांगबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट मागील अनेक महिन्यांपासून सेवा बजावत आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले यांच्या हस्ते या नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांच्या माध्यमातून वर्षभर चालणाऱ्या सामाजिक उपक्रमातून प्रेरणा घेत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांनी बदलापूर पूर्व शिरगाव आपटेवाडी परिसरातील गरजू आणि दिव्यांग नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य वाटपाचे काम त्यांनी हाती घेतले. या उपक्रमाला आशीष दामले यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते या नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या मदतीचा लाभ घेणाऱ्या या नागरिकांनी अनिल मराडे व दामले यांचे यावेळी विशेष आभार मानले.
