पुणे क्रीडा प्रबोधिन उपविजेते
अहिल्यानगर २७ नोव्हेंबर – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आज पुणे जिल्हा संघाने ३० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर पुणे क्रिडा प्रबोधिनी संघाने १२ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. अहिल्यनगर संघ १० गुणांसह तिस-या स्थानावर राहीला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २६ जिल्ह्यांच्या सायकलपट्टूंनी सहभाग घेतला. चाँदबीबी महाल बायपास मार्गावर विवध नऊ वयोगटात स्पर्धा पार पडल्या.
अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अहिल्यानगर जिल्ह्याचे अतिरीक्य पोलीस अधिकक्ष प्रशांत खैरे यांच्या हस्ते आणि अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अहमदनर सायकलिंग क्लबचे गौरव फिरोदीया यांच्या अधअध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, सीएफआय चे निरीक्षक सुदाम रोकडे, मिहीर तिवारी, तांत्रिक प्रमुख दिपाली पाटील, पंचप्रमुख धरमेंदर लांबा, शिवछत्रपती पारितोषीक सन्मानीत मिनाक्षी चौधरी – शिंदे, मिनाक्षी ठाकूर, प्रा. साईनाथ थोरात आदी मान्यवर हजर होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ३० कि मी इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायल, मेन जुनिअर – सुवर्णपदक निहाल नदाफ (सांगली ४४.५०.३४), रौप्यपदक विपलव मालपुते (पुणे ४६.३०.४७), कांस्यपदक समरजीत थोरबोले (पुणे केपी ४८.२०.२७), १९ कि मी टाईम ट्रायल, वुमेन ज्युनिअर – सुवर्णपदक जुई नारकर ( मुंबई – ३०.३६.३१), रौप्यपदक आकांक्षा म्हेत्रे (जळगाव – ३१.१६.४५) कांस्यपदक सिद्धी शिर्के ( पुणे – ३२.०८.५०) १८ कि मी रोड रेस सब ज्युनियर गर्ल्स – सुवर्णपदक आभा सोमण (पुणे – ३८.२६.७५) रौप्यपदक प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली – ३८.२७.१४) कांस्यपदक श्रावणी कासार (पुणे के पी – ३८.३१.३४), ३० किमी रोड रेस सब ज्युनियर बॉईज – सुवर्णपदक श्रीनिवास जाधव (पुणे के पी – (५७.०१.८७), रौप्यपदक आर्यन मलगे ( कोल्हापुर – ५७.०१.९०), कांस्यपदक ओंकार गंधाले (पुणे के पी – ५७.०२.१९), ३० किमी रोड रेस वुमेन ज्युनियर – सुवर्णपदक आकांक्षा म्हेत्रे (जळगाव – १.०३.५२.२१), रौप्यपदक आसावरी राजमाने (पुणे केपी – १.०३.५३.३७) कांस्यपदक सिद्धी शिर्के (पुणे – १.०३.५४.३१३), ३६ किमी रोड रेस एलाईट वुमेन – सुवर्णपदक प्रणिता सोमण (अहिल्यानगर – १.०६.३६.२९) रौप्यपदक पुजा दानोले (कोल्हापुर – १.०६.३८.६१), कांस्यपदक योगेश्वरी कदम (सांगली – १.१४.३५.७५), ३६ कि मी रोड रेस मेन जुनियर – सुवर्णपदक निहाल नदाफ़ (सांगली – १.०३.४६.७७), रौप्यपदक हरिश डोंबाळे (पुणे केपी – १.०३.४८.११), कांस्यपदक प्रजींन नादार (मुंबई – १.०३.४८.१२), ५४ किमी रोड रेस मेन २३ – सुवर्णपदक दत्तात्रय चौगुले (सांगली – १.२५.२४.४३), रौप्यपदक ….. दवंडे (मुंबई – १.२५.२७.५६), कांस्यपदक ओम कारंडे (अहिल्यानगर – १.२५.२९.०३), ५४ किमी रोड रेस इलाइट मेन – सुवर्णपदक सूर्या थात्तू (पुणे – १.२५.२१.३८), रौप्यपदक सिद्धेश् पाटील (कोल्हापूर – १.२५.२३.०३), कांस्यपदक सुदर्शन देवर्डेकर (पुणे – १.२५.३९.३९)