Photo-6
मुंबई: प्राईम सिक्युरिटीज प्रायोजित प्राइम-ब्रिज स्पर्धेत ( 2024) मुंबईच्या मरियाना आणि संदीप या करमरकर दांपत्याने मिश्र जोडी प्रकाराचे जेतेपद पटकावले.
बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप आणि मरियाना या पती-पत्नीने सर्वाधिक 1431 गुणांसह बाजी मारली. मुंबईस्थित
हिमानी आणि राजीव खंडेलवाल जोडीने 1388 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. अहमदाबादच्या नीना शाह आणि कौस्तुभ देवधर जोडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मुख्य फेरीसाठी पात्रता न ठरलेल्या स्पर्धकांसाठीच्या स्ट्रॅटा जोडी स्पर्धेत दीपिका मेहता आणि रवी कौल विजेते तर अलका क्षीरसागर आणि इव्हान अल्फोन्सो उपविजेते ठरले.
0000
