उल्हासनगर : महात्मा ज्योतिबा फुले मनपा शाळा क्रमांक 17, गोपाळ नगर सी ब्लॉक शहाड स्टेशन रोड या शाळेचे बांधकाम सुरू असून याव्यतिरिक्त शअण्णा भाऊ साठे मनपा शाळा क्रमांक 24 (मराठी माध्यम) स्वामी लीला शाह मनपा शाळा क्रमांक 18 (हिंदी माध्यम) यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या शैक्षणिक वर्षात जून 2025 पासून नवीन इमारतीत सर्व सुविधायुक्त शाळा सुरू होणार आहे.
आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांचा कायापालट करण्याच्या हाती घेतले असून यात भौतिक सुविधा त्याचबरोबर गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. सर्व शाळांची रंगसंगती एक करण्यात येत आहे.
आदर्श शाळा योजनेअंतर्गत शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आज मनपा शाळा क्रमांक 17 याची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. शाळांचे बांधकाम करत असतानाच आवश्यक त्या बाबी शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार करण्याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या.
00000
