मुंबई : मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्स शाळेने दुर्गादेवी सराफ चषकावर आपले नाव कोरले, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
अंतिम सामन्यात त्यांनी चिल्ड्रन्स अकॅडमी मालाड संघाचा २५- ५ , २५- २३ असा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.१२ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्सनेच बाजी मारली .त्यांनी चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगर चा २५- ११, २६- २४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून श्री डब्ल्यू ए करकाडा मेमोरियल ट्रॉफी वर आपले नाव कोरले. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्सने चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगर चा २२- २५ , २५-२०, १६- १४ असा पराभव करून टाईट नट अँड बोल्ट ट्रॉफीवर आपले नाव कोरले .१४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात एम. आर. सिद्दिकी चषक सेंट लॉरेन्स हायस्कूल बोरिवलीने पार्ले तिलक विद्यालय आयसीएसइ चा २५-५, २५-१८ असा दोन सरळ सेटमध्ये पराभव करून पटकावला. सोळा वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात एफ.बी. मास्टर मेमोरियल चषक चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगरने आर्य विद्या मंदिर जुहू चा २५- १०, २३ – २५, १५ -३ गुणांनी पराभव करून जिंकला. मुलींच्या १६ वर्षाखालील अंतिम सामन्यात चिल्ड्रन्स अकॅडमी माAलाड ने चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगर चा २५ -१३, २५- २३ गुणांनी पराभव करून अपोस्ट्रोलिक कारमेल ट्रॉफीवर आपले नाव कोरले.यावर्षी प्रथमच हॉलीबॉल स्पर्धा लीग कम नॉक आऊट बेसिस वर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धा दिनांक ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत शिशुवन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माटुंगा येथे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे मिंटोनी प्लस अकॅडमीचे को- फाउंडर शिजु लोनापन व विशेष अतिथी म्हणून विक्रोळीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता घोडके मॅडम याही आवर्जून उपस्थित होत्या. एम एस एस ए हॉलीबॉल सेक्रेटरी राजाराम बाळू पवार इंडियन गेम सेक्रेटरी डी. डी .शिंदे बास्केटबॉल सेक्रेटरी महेंद्र रामचंद्र जंगम तसेच मिंटोनी प्लस अकॅडमीचे अतुल सावडावकर व किशोर सावंत हेही या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *