ठाणे, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम ठाणे जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम २३ डिसेंबर २०२४ ते 3 जानेवारी २०२५ या कालावधीत राबवण्यात येणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती सभा आज, दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. आशा सेविकांमार्फत अति जोखमीच्या भागात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले.
सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यासाठी 95 गटामार्फत अति जोखमीच्या ठिकाणी विटभट्टी कामगार, झोपडपट्टी, आश्रमशाळा इ. ठिकाणी आशा सेविका मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून क्षयरोगाचे जास्तीत जास्त निदान होण्याकरिता क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्याचा जिल्ह्याचा कृती आराखडा व नियोजन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अलका परगे यांनी सविस्तर माहिती दिली. निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. मृणाली राहुड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटिल, साई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय दुगाड फाटा दाभाड भिवंडी चे प्राध्यापक डॉ. अर्चना कोटलवार, बी. आर. हारणे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय चे प्राध्यापक डॉ. तेजस मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल बाग तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *